छत्रपती संभाजीनगर : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून (दि. ९ मे) छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू झाला असून, यामध्ये शहर ‘गार्बेज फ्री सिटी’ म्हणजेच कचरामुक्त शहर म्हणून पात्र आहे का, याची तपासणी केली जाणार आहे.

या सर्वेक्षणासाठी आठ सदस्यांचे केंद्रीय पथक शहरात दाखल झाले आहे. महापालिकेचे उपायुक्त विजय पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. हे पथक शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन स्वच्छतेबाबत आढावा घेणार आहे.

महापालिकेच्या वतीने शहरात चिकलठाणा, पडेगाव आणि हसूल येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू आहेत. तसेच कांचनवाडी येथे ३० मेट्रिक टन क्षमतेचा गॅस निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.

ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यासाठी रेड्डी कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, ही कंपनी दररोज घरोघरी जाऊन नियमित कचरा संकलन करते.

शहरातील नारेगाव डंपिंग ग्राउंडवर बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. तसेच नियमभंग करणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाईही सुरू आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाचे एकूण तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण स्वच्छतेचा, दुसऱ्या टप्प्यात ‘गार्बेज फ्री सिटी’चा आणि तिसऱ्या टप्प्यात ‘वॉटर प्लस’चा आढावा घेतला जात आहे.

महापालिकेचा प्रयत्न शहराला ‘कचरामुक्त’ मानांकन मिळवून देण्याचा असून नागरिकांच्या सहकार्याने हे ध्येय साध्य करता येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

758 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क