मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल उद्या, १३ मे रोजी जाहीर होणार आहे. सकाळी ११ वाजता मंडळाचे अध्यक्ष निकालाची घोषणा करतील, तर विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजेपासून अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

या निकालाची विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्ग आतुरतेने प्रतीक्षा करत होते. यंदा बारावीच्या निकालानंतर लगेच दहावीचा निकाल जाहीर होईल, असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र, मंडळाकडून यापूर्वी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती.

आता मंडळाने अधिकृत माहिती देत निकालाबाबतची अनिश्चितता संपवली आहे. निकाल मंडळाच्या mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि ssc.mahresults.org.in या संकेतस्थळांवर पाहता येईल.

विद्यार्थ्यांना आपल्या रोल नंबर आणि आईच्या नावाच्या आधारे निकाल पाहता येणार आहे. यंदाचा निकाल किती टक्के लागतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तुमचा निकाल पाहण्यासाठी तयार राहा — १३ मे, सकाळी ११ वाजता निकालाची घोषणा, दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार!

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

815 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क