छत्रपती संभाजीनगर – राज्य संरक्षित स्मारक असलेल्या मकाई गेटची देखभाल व दुरुस्तीची कामे येत्या काही महिन्यांमध्ये हाती घेण्यात येणार आहेत. या कामादरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मकाई गेट दरवाजा ते टाऊन हॉलकडे जाणारा अंतर्गत रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी १८ मे ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती छावणी वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक सचिन मिरधे यांनी दिली.

पुरातत्त्व विभागाने या ऐतिहासिक दरवाज्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. शासनाकडून याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता दुरुस्तीची कामे सुरु होणार आहेत.

दरम्यान, बंद रस्त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बीबी का मकबऱ्याकडे जाणारी व येणारी सर्व वाहने आता मिल कॉर्नर, मिलिंद चौक, विद्यापीठ गेट, बेगमपुरा चौक मार्गे वळवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्युबिली पार्क मार्गे पाणचक्की गेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, बेगमपुरा चौक या मार्गाने देखील वाहतूक करता येणार आहे.

वाहनधारक व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,264 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क