छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते जालना या अतिवर्दळीच्या रस्त्यावर सुसाट जाणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवा उपक्रम राबवला आहे. शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत विभागाचे अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्यावर १० ते १२ ठिकाणी स्पीड सेन्सर बसविण्यात आले आहेत.

या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा असते. अनेक वाहनचालक वेग मर्यादा ओलांडून वाहन चालवत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत होते. या पार्श्वभूमीवर स्पीड सेन्सरच्या माध्यमातून वाहनाचा वेग किती आहे, याची माहिती वाहनधारकांना लगेच मिळणार आहे. त्यामुळे वाहन चालकाला वेग कमी करण्यासाठी जागरूक होण्यास मदत होणार असून, अपघातांवर नियंत्रण ठेवण्यास ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

या उपक्रमामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाची झलक दिसून आली असून, वाहनधारकांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, सुभेदारी येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांना आता चार्जिंगसाठी वेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. ही सुविधाही शंभर दिवस सुधारणांच्या कार्यक्रमाचा भाग असून, शासनाच्या पर्यावरणपूरक वाहन धोरणास पूरक आहे.

या दोन्ही उपक्रमांमुळे सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये आधुनिकता आणि सुरक्षितता यांचा मिलाफ साधण्यात यश मिळाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,280 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क