छत्रपती संभाजीनगर : शहरातील भाजीपाला व फळ बाजारात प्लास्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे. याच अनुषंगाने, प्लास्टिक बंदीला बळकटी देण्यासाठी आणि नागरिकांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात पाच ठिकाणी कापडी पिशव्या देणारी व्हेंडिंग मशीन (Cloth Bag Vending Machine) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ही माहिती देण्यात आली असून, लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना सहजपणे कापडी पिशव्या मिळाव्यात, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कारवाई करण्यात आली होती, मात्र तरीही बाजारपेठांमध्ये प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याचे आढळून आले होते.

प्लास्टिकमुक्त शहराचे स्वप्न साकार करण्यासाठी मनपाने अनेक उपाययोजना राबवल्या असून, नागरिकांचा सक्रिय सहभाग देखील आवश्यक असल्याचे घनकचरा विभागाने नमूद केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

952 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क