छत्रपती संभाजीनगर : राज्यातील पोलीस विभागात मंगळवारी (दि. २७ मे) मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलिस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी हे आदेश जारी केले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांची बदली जालना येथील प्रशिक्षण केंद्रात झाली आहे.
शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या पुढीलप्रमाणे –
• संदीप गुरमे – जालना प्रशिक्षण केंद्र
• संदीप भोसले – पुणे शहर
• दिलीप ठाकूर – नाशिक
• शरद जोगदंड – बीड
• कोमल शिंदे – ACB
• शेषराव खटाणे – नांदेड परिक्षेत्र
• नितीन कामे – नाशिक परिक्षेत्र
• शरद रोडगे – ACB
शहरात नव्याने आलेले निरीक्षक –
• शिवाजी बुधवंत – शहर आयुक्तालय
• कुंदनकुमार वाघमारे – शहर आयुक्तालय
• योगेश मेहुणकर – लोहमार्ग
• शंकर शिंदे – लोहमार्ग
• गोरखनाथ गांगुर्डे – लोहमार्ग
लोहमार्गचे पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांची बदली बीड येथे झाली आहे. तसेच छावणीचे निरीक्षक दिलीप ठाकूर यांची बदली नाशिकला करण्यात आली आहे. संदीप भोसले यांची पुण्यात तर कोमल शिंदे यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) करण्यात आली आहे.
राज्यभरात बदल्यांची मोठी यादी
या फेरबदलात राज्यभरातील २४९ पोलीस निरीक्षक, ४२९ सहायक निरीक्षक यांच्यासह १२१ निरीक्षक आणि ७४ सहायक निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचा समावेश आहे. कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, बदल्यांमुळे पोलिस प्रशासनात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*