छत्रपती संभाजीनगर : शहरातील साहसी ट्रेकर्सनी प्रेरणादायी कामगिरी बजावत २४ मे रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्प (५,३६४ मीटर) पर्यंत यशस्वीरित्या पोहोचण्याचा इतिहास घडवला आहे. एव्हरेस्टवीर रफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १९ ट्रेकर्सनी हा अति कठीण आणि साहसी ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला.

या चमूमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, उद्योजक, शिक्षक, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि विशेष म्हणजे अवघ्या १३ वर्षांचे दोन विद्यार्थी यांचा समावेश होता. १५ मे रोजी काठमांडूपासून लुकला एअरपोर्टपर्यंत प्रवास करत या ट्रेकची सुरुवात झाली. लुकलापासून पुढे खडतर पर्वतीय वाटेने त्यांनी नामचे बाजार (३,४०० मीटर), डेंगबुचे (४,४१० मीटर) आणि शेवटी लेबुचे (४,९६० मीटर) अशी उंची गाठत २४ मे रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला.

या प्रवासात थंड हवामान, ऑक्सिजनची कमतरता, खोल दऱ्या आणि हाय अल्टिट्यूड सिकनेस यासारख्या अनेक अडथळ्यांवर मात करत सर्वांनी आपल्या जिद्दीचा आणि चिकाटीचा प्रत्यय दिला.

ही मोहीम यशस्वी होण्यासाठी ‘ड्रीम अ‍ॅडव्हेंचर छत्रपती संभाजीनगर’ संस्थेने गेल्या पाच महिन्यांपासून सर्व ट्रेकर्सना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कठोर प्रशिक्षण दिले. आठवड्यातून चार दिवस नियमित सराव, स्थानिक ट्रेक्स आणि प्रतिकूल हवामानातील तयारीमुळेच हे यश मिळवता आले, असे सहभागी सदस्यांनी सांगितले.

या मोहिमेत सहभागी झालेले ट्रेकर्स:

रफिक शेख, विक्रम साळी (एसआरपीएफ कमांडंट), तुकाराम कंदाकुरे, रवींद्र कोंडेकर, दिगंबर मुळे, उत्कर्ष नागोरी, आशिष अग्रवाल, भूषण चव्हाण, परलीन सिंग, मीनाक्षी कडू (मुख्याध्यापिका), डॉ. श्रद्धा चांडक, कल्याणी भारंबे, सत्या कोटकर, निशा ललवाणी, विजय राठी (सीए), प्रिया फुलवाणी (सीए), अॅड. रूहिला नाज, मधुकर राशीनकर (अकाउंटंट), वेदी राठी (१३ वर्षे), वेदांश चांडक (१३ वर्षे)

या साहसी मोहिमेने छत्रपती संभाजीनगरच्या ट्रेकिंग संस्कृतीला नवे बळ दिले असून, युवापिढीला प्रेरणा मिळेल असा संदेश या चमूने दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

752 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क