क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, तो टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी खेळत राहणार आहे.

ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाकडून आपला शेवटचा एकदिवसीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताविरुद्ध खेळला होता. मॅक्सवेलने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 149 एकदिवसीय सामन्यांत 3990 धावा करताना 4 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय, त्याच्या खात्यात 79 विकेट्सही आहेत. त्याचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर 201 धावा असून, तो एकदिवसीय क्रिकेटमधील ऐतिहासिक खेळींपैकी एक मानला जातो.

निवृत्तीबाबत मॅक्सवेलने मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांना आधीच कल्पना दिली होती. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान मॅक्सवेलने स्पष्ट केले होते की, तो 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळण्याच्या स्थितीत नाही.

‘फायनल वर्ड’ पॉडकास्टमध्ये बोलताना मॅक्सवेल म्हणाला, “त्यावेळी मी बेलीला स्पष्ट सांगितले होते की, ‘मला वाटत नाही की मी 2027 च्या विश्वचषकासाठी खेळू शकेन.’”

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मॅक्सवेल आयपीएल 2025 मध्येही खेळताना दिसला होता. मात्र, दुखापतीमुळे काही सामन्यांनंतर त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

आता मॅक्सवेल फक्त टी-20 फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी खेळणार असून, त्याच्या आक्रमक शैलीने क्रिकेटप्रेमींना आगामी स्पर्धांमध्ये मनोरंजन मिळणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

546 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क