छत्रपती संभाजीनगर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोवंशांची अवैध कत्तल रोखण्यासाठी सिटी चौक पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण ८६ गोवंशांची सुटका केली. ही कारवाई ४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास किले अर्क आणि जलाल कॉलनी परिसरात चार ठिकाणी छापे टाकून करण्यात आली.

पहिल्या कारवाईत किले अर्क भागातील एका मशिदीच्या मागील वाड्यात काळ्या ताडपत्रीखाली लपवून ठेवलेले ७२ गोवंश आढळून आले. पोलिसांनी तातडीने जनावरे ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षितपणे गोशाळेत पाठवले. याप्रकरणी मिर्झा अनिस बेग मिर्झा हमीद बेग (३४, रा. रोहिला गल्ली) आणि नदीम खान नईम खान (३०, रा. हिमायत बाग) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दुसऱ्या कारवाईत कर्करोग रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या पडक्या जागेवरून ६ गोवंशांची सुटका करण्यात आली असून इस्तियाक बाबूमियाँ कुरेशी याला अटक करण्यात आली.

तिसऱ्या आणि चौथ्या कारवाईत चित्तेखाना कब्रस्तान व जलाल कॉलनी भागातून अनुक्रमे २ आणि ६ गोवंशांची सुटका करण्यात आली. या सर्व गोवंशांची अंदाजे किंमत २० लाख रुपये असून, त्यांना गोशाळेत हलवण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अर्जुन कदम, मंगेश जगताप, तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,141 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क