छत्रपती संभाजीनगर : बकरी ईदनिमित्त छावणी ईदगाह आणि रोजेबाग ईदगाह या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी उपस्थित राहतात. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, म्हणून प्रशासनाकडून शनिवार, ७ जून रोजी सकाळी ५ ते ११ या वेळेत वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
वाहतुकीसाठी बंद मार्ग
• मिलींद चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.
• हडको कॉर्नर ते उध्दवराव पाटील चौकपर्यंत रोजाबाग ईदगाहकडील रोडची एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग
• मिलींद चौक ↔ विद्यापीठ गेट
या मार्गावर जाणारी व येणारी वाहने मिलकॉर्नर – भडकल गेट – टाऊन हॉल उड्डाणपुलाखालून – मकाई गेट – बेगमपुरा चौक या मार्गाचा वापर करतील.
• घाटी दवाखाना, पाणचक्की ↔ मिलींद चौक
या दिशेने येणारी वाहने घाटी दवाखाना – ज्युब्ली पार्क – मिलकॉर्नर – बारापुल्ला गेट – मिलींद चौक या पर्यायी मार्गाचा वापर करतील.
• घाटी दवाखाना, पाणचक्की ↔ विद्यापीठ गेट व बेगमपुरा
या दिशेने जाणारी वाहने घाटी दवाखाना – ज्युब्ली पार्क – टाऊन हॉल – मकाई गेट या मार्गाने प्रवास करतील.
• उध्दवराव पाटील चौक ↔ हडको कॉर्नर
या मार्गावरील वाहने शासकीय दवाखान्याकडील बाजूने प्रवास करतील.
नागरिकांनी दिलेल्या वेळेत या मार्गांचा वापर करत वाहतूक पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*