छत्रपती संभाजीनगर :  पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क आणि छत्रपती संभाजीनगर या दोन महत्वाच्या ठिकाणांदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने या मार्गावर शिवनेरी एसी बस सेवा सुरू केली आहे.

ही सेवा प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता हिंजवडी आयटी पार्क फेज-३ येथून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होईल. तसेच, प्रत्येक सोमवारी पहाटे ४.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथून पुण्याकडे बस सुटणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या, पण मूळगाव छत्रपती संभाजीनगर असलेल्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा फारच उपयुक्त ठरणार आहे. या बसमुळे प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि आरामदायी होणार असून, दोन शहरांमधील दळणवळण सुलभ होणार आहे.

या सेवेबद्दल अधिक माहिती आणि आरक्षणासाठी MSRTC च्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपवर संपर्क साधता येईल.

ही सुविधा ‘वर्किंग वीक’ नंतर घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरेल, असे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,144 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क