छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आता सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचण्यांसाठी अर्धेच शुल्क भरावे लागणार आहे. उर्वरित ५० टक्के शुल्क जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भरले जाणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदीपन भुमरे, आमदार विक्रम काळे, राजेश राठोड, प्रशांत बंब, प्रदीप जयस्वाल, अनुराधा चव्हाण यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी समितीत सन २०२५-२६ साठी एकूण ८४९ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण योजनांसाठी ७३५ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १०४ कोटी, तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी १०.४६ कोटींचा समावेश आहे.

पालकमंत्री शिरसाट यांनी स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठीही मोठा निर्णय घेतला असून, प्रत्येक आमदारांना त्यांच्या मतदारसंघात कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय, पावसाळ्यात वीज कोसळून होणाऱ्या दुर्घटनांपासून संरक्षणासाठी अधिकाधिक वीज अटकाव यंत्रे बसवण्यावर भर देण्यात आला आहे.

शिरसाट यांनी प्रत्येक विभागाने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवावा, असे निर्देश दिले असून यासाठी वेळापत्रक तयार करून लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव मांडला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,168 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क