जागतिक वाहननिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘टोयोटा मोटार्स’ आणि भारतीय कंपनी ‘किर्लोस्कर’ यांनी शहरातील ऑरिक सिटीमध्ये तब्बल २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी ८०० एकर जागेत उद्योगसमूहाची उभारणी करण्यात येणार असून, २०२७ पर्यंत उत्पादन सुरू होणार आहे.
गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, डिसेंबर २०२४ अखेरीस ‘टोयोटा’च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल. याशिवाय, जेएसडब्ल्यू कंपनी बिडकीनमध्ये २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, ज्यामुळे औद्योगिक क्रांतीला चालना मिळेल. एमएसएमई कंपन्यांना पाठबळ मिळविण्यासाठी हा मोठा अँकर प्रोजेक्ट ठरणार आहे.
या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, दीपक ढाकणे हे देखील उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kqy4OPp3LZSAiLoBGmRmIl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*