नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला असून, यामुळे शेतीसंबंधित निर्णय अधिक अचूक आणि फायदेशीर होणार आहेत. आता शेतकऱ्यांना त्यांच्या ‘Farmer ID’ च्या आधारे त्यांच्या शिवारासाठी सुस्पष्ट हवामानाची माहिती थेट मोबाईलवर SMS किंवा अॅपद्वारे मिळणार आहे.
भारतभरातील जवळपास ६.५ कोटी शेतकऱ्यांचे Farmer ID तयार करण्यात आले असून, या ओळखपत्रात शेतकऱ्याचे नाव, जमिनीच्या नोंदी, शेतीचे क्षेत्र, पिकांची माहिती आणि आधार क्रमांकाचा समावेश आहे. या डेटाच्या आधारे सरकारकडे प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षेत्राची अचूक माहिती उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढील प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे:
✅ त्यांच्या गावाच्या हवामानाचा आगामी सात दिवसांचा अंदाज
✅ तापमान, पावसाचे प्रमाण, वाऱ्याचा वेग, आर्द्रता यांची माहिती
✅ हे सर्व रिअल टाइम अपडेट्ससह आणि शेतकऱ्यांच्या भाषेत पाठवले जाईल
✅ या माहितीचा उपयोग करून शेतकरी खते टाकणे, फवारणी करणे, पेरणी, कापणी आणि सिंचन यांसारखी शेतीतील महत्त्वाची कामे योग्य वेळ साधून करू शकतील.
सध्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाऊस कधी पडेल, वादळ कधी येईल याचा अंदाज न लागल्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आता या नव्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर सावधगिरी बाळगता येणार आहे.
हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावणारा ठरणार असून, डिजिटल शेतीच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*