छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्यातील ११वी (FYJC) प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर होणार असल्याची अधिकृत माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि आरक्षणातील बदलांमुळे ही यादी अपेक्षित वेळेत प्रसिद्ध होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहेत.

शालेय शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, अल्पसंख्यांक संस्था आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर काही तांत्रिक बदल आवश्यक ठरले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मेरिट व्यवस्थित तयार करण्यासाठी आणि प्रणालीतील चुका दूर करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे.

त्यामुळे आता ही पहिली गुणवत्ता यादी ३० जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. त्यानंतर, ज्यांना जागा मिळेल अशा विद्यार्थ्यांनी २७ जून ते ३ जुलै २०२५ या कालावधीत संबंधित कॉलेजमध्ये आवश्यक कागदपत्रांसह हजर राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी mahafyjcadmission.in या अधिकृत संकेतस्थळावर आपले लॉगिन तपासत राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त वेळ घेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

468 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क