पणजी : गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (GSRLM) मार्फत ताज विवांता, पणजी येथे आयोजित राज्यस्तरीय बँकर्स कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महिलांच्या स्वयंसहायता गटांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी, बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध गटांच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, आतापर्यंत राज्यात ३,२५० स्वयंसहायता गट स्थापन होऊन ४३,००० पेक्षा अधिक कुटुंबांना आर्थिक बळकटी मिळाली आहे. हे फक्त आकडे नाहीत, तर महिला सक्षमीकरणाच्या प्रेरणादायी कहाण्या आहेत, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, जी २०२३ मध्ये सुरू झाली, त्याअंतर्गत १७० महिला गटांचे पॅनेलिंग झाले असून १४ कॅन्टीन विविध शासकीय कार्यालयांमध्ये सुरू आहेत. ही कॅन्टीन महिलांना उत्पन्नाचे स्रोत तर ठरलीच आहेत, पण एक उदाहरणही ठरली आहेत की महिलांचे नेतृत्व समाज बदलू शकते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी २०२४–२५ या आर्थिक वर्षात SHG गटांना वितरित झालेल्या ३६५ कोटी रुपयांच्या कर्जाचे विशेष उल्लेख करत बँकिंग संस्थांचे आभार मानले. त्यांनी सर्व बँकांना आवाहन केले की, महिला गटांना कर्ज सुलभतेने उपलब्ध करून द्यावे, आर्थिक व डिजिटल साक्षरतेस चालना द्यावी.

शेवटी, डॉ. सावंत यांनी सांगितले की, प्रत्येक लघुउद्योग चालवणारी महिला ही गोव्याच्या आत्मनिर्भरतेकडे टाकलेलं एक ठाम पाऊल आहे. गावागावांतील नारीशक्तीच गोव्याच्या खऱ्या विकासाचा पाया आहे.

162 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क