छत्रपती संभाजीनगर :  सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची संधी घेऊन येणारी म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण) ची लॉटरी योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ३० जून २०२५ पासून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि बीड विभागांतील एकूण १४१८ सदनिकांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), म्हाडा अंतर्गत गृहनिर्माण योजना आणि २०% सर्वसमावेशक योजना अशा तीन गटांतील सदनिकांचा समावेश आहे. EWS, LIG, आणि MIG उत्पन्न गटांतील पात्र अर्जदारांना या योजनेंतर्गत घरे मिळणार आहेत.

या योजनेंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट २०२५ असून, अर्ज IHLMS 2.0 ऑनलाईन पोर्टलद्वारे सादर करता येतील. अर्जदारांनी कोणत्याही एजंटाच्या माध्यमातून न जाता थेट अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅपवरून अर्ज करावा, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रत, उत्पन्न प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि बँक तपशील अचूकपणे भरावेत. अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शक पुस्तिका, व्हिडिओ आणि हेल्प डेस्कची सुविधा देखील उपलब्ध आहे.

पात्र अर्जदारांची प्राथमिक यादी, हरकती, आणि अंतिम यादी जाहीर केल्यानंतर लॉटरीद्वारे सदनिका वाटप केले जाईल. घर खरेदीची स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही एक उत्तम आणि पारदर्शक संधी असून, इच्छुकांनी वेळेत अर्ज करून फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,210 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क