छत्रपती संभाजीनगर :  उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या होमगार्डच्या कुटुंबीयांकडून सानुग्रह अनुदान व उपचाराच्या बिलासाठी लाच मागणाऱ्या जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील प्रमुख लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे, या लाचखोरीसाठी आरोपीने थेट फोनपेवर १५ हजार रुपये स्वीकारले.

ही कारवाई गुरुवारी (३ जुलै) दुपारी छत्रपती संभाजीनगरमधील एन-१२ येथील होमगार्ड समादेशक कार्यालयात करण्यात आली. सोपान पंडितराव टेपले (वय ४१, रा. मयूरपार्क) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे.

तक्रारदार २४ वर्षीय युवतीचे वडील होमगार्ड पदावर कार्यरत होते. त्यांच्या उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर अनुदानासाठी मुलीने कायदेशीर अर्ज केला होता. त्यानंतर ती संबंधित फाईलबाबत माहिती घेण्यासाठी समादेशक कार्यालयात गेली असता, आरोपी टेपले यांनी तिला अनुदान मंजुरीसाठी २० हजारांची लाच मागितली.

तरुणीने लाच न देता एसीबीकडे तक्रार दाखल केली. बुधवारी झालेल्या पडताळणीदरम्यान आरोपीने लाच मागणी स्पष्टपणे केली. तडजोडीअंती १५ हजार रुपये फोनपेवर पाठवण्याचे सांगितले. गुरुवारी तक्रारदार तरुणीने फोनपेवर १५ हजार रुपये पाठवले आणि टेपले यांना फोन करून पैसे पोहोचल्याची खात्री करून दिली.

त्यानंतर ACB पथकाने तत्काळ समादेशक कार्यालयात धाव घेत टेपलेला रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. डिजिटल माध्यमातून लाच स्वीकारल्याने या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

872 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क