छत्रपती संभाजीनगर : उपवासाच्या काळात मोठ्या प्रमाणात सेवन केली जाणारी भगर (सामो) योग्य प्रकारे साठवली न गेल्यास तिच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन अन्नविषबाधा होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी सजग राहावे आणि बुरशीग्रस्त भगर विक्रीस आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिला आहे.

विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये Aspergillus प्रजातीच्या बुरशीचे प्रमाण वाढते. या बुरशीमुळे Fumigaclavine नावाची विषद्रव्ये तयार होतात, जी आरोग्यास घातक ठरू शकतात. त्यामुळे बाजारातून भगर खरेदी करताना ती स्वच्छ आहे का, याची खातरजमा करणे आवश्यक आहे.

नागरिकांनी शक्यतो पॅकबंद आणि ब्रँडेड भगर खरेदी करावी, पॅकींग व वापर दिनांक तपासावा, तसेच साठवताना ती कोरड्या व झाकणबंद डब्यात ठेवावी. जास्त दिवस साठवलेली भगर किंवा पीठ खाणे टाळावे. शक्य असल्यास भगरीचे पीठ घरीच तयार करावे आणि अल्पकालीन साठा ठेवावा. बुरशीयुक्त भगर खाल्ल्यास अपचन, मळमळ, उलटी, अ‍ॅसिडीटीसारखे त्रास होऊ शकतात.

विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी सुरक्षित भगर पुरविणे आवश्यक असून, पावतीसह घाऊक खरेदी, पॅकबंद मालाची विक्री आणि लेबलसह माहिती असलेली भगरच विकावी. सुटी भगर किंवा खुले पीठ विक्रीस ठेवू नये, अशी सूचना करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने भगर विक्रेत्यांच्या दुकानांवर तपासणी मोहीम हाती घेतली असून, भेसळयुक्त वा बुरशीयुक्त भगर विक्री करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

614 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क