छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आज दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवत २४५ पक्की व कच्ची बांधकामे निष्कासित केली. ही कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशाने, तर नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

हटविण्यात आलेल्या अतिक्रमणांमध्ये हॉटेल, दुकाने, गॅरेज, शेड, कंपाऊंड, जाहिरात फलक व कमानी यांचा समावेश होता. या मोहिमेसाठी महापालिकेचे ३५० अधिकारी व कर्मचारी, तर पोलीस विभागाचे २५० अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाई दरम्यान १५ जेसीबी, ४ पोकलॅन, १५ टिप्पर, २ रूग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने, २ अग्निशमन बंब आणि ५ इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहने अशा यंत्रणांचा वापर करण्यात आला.

यावेळी नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, पोलीस सहायक आयुक्त रणजीत पाटील, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उद्या हर्सूल टी पॉईंट ते सिडको बस स्टँड रस्त्यावर मोहीम

नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या दिनांक ८ जुलै रोजी हर्सूल टी पॉईंट ते सिडको बस स्टँड दरम्यान अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,158 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क