छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर थकवणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने ‘शास्ती से आझादी’ ही विशेष योजना जाहीर केली असून, १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत एकरकमी थकीत कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना तब्बल ९५ टक्के व्याजमाफी दिली जाणार आहे.

महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जात असून, गेल्या काही वर्षांपासून व्याजाच्या चक्रवाढीतून सुटका न झालेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका थकीत करावर दरवर्षी २४ टक्के व्याज आकारते. त्यामुळे मूळ करापेक्षा व्याजाची रक्कम अधिक होत असल्याने अनेक नागरिक कर भरण्याकडे दुर्लक्ष करतात.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरात कोट्यवधी रुपयांची कर थकबाकी आहे. चालू आर्थिक वर्षात महापालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून ७०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ६३ हजार ७८१ मालमत्ताधारकांनी एकूण ६२.५६ कोटी रुपयांचा कर भरला आहे.

‘शास्ती से आझादी’ योजनेसोबतच ‘शास्ती से मुक्ती’ ही दुसरी योजना देखील सुरू करण्यात आली आहे. यानुसार, १६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान थकीत कर भरणाऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत व्याजमाफी दिली जाणार आहे.

महापालिकेने नागरिकांना या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले असून, एकरकमी थकीत कर भरून मालमत्तेवर असलेली दंडात्मक व्याजाची झळ कमी करण्याची संधी मिळणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

895 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क