छत्रपती संभाजीनगर : शहरातील जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल १५ महागडे मोबाइल फोन शोधून मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. या कारवाईमुळे तक्रारदारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले असून, पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सर्व मोबाइल फोनची एकूण किंमत सुमारे ४ लाख २० हजार रुपये इतकी आहे. सीईआयआर पोर्टल, सायबर सेल व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून ही यशस्वी मोहीम पार पडली. या मोबाइलपैकी काही चोरीचे होते, काही हरवलेले तर काही प्रॉपर्टी गुन्ह्यांशी संबंधित होते.
पोलिसांनी बिहार, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम राबवत विविध ठिकाणांहून हे मोबाइल हस्तगत केले. हे मोबाईल मूळ मालकांकडे परत करताना अनेकांनी भावना अनावर केल्या. काही मोबाइल्स हे त्यांच्या पत्नी, आईवडिलांनी गिफ्ट दिलेले होते, काही ईएमआयवर घेतलेले होते, त्यामुळे परत मिळाल्याचा आनंद तक्रारदारांनी व्यक्त केला.
ही विशेष मोहीम पोलिस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त रणजीत पाटील, आणि निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मारोती गोरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
या कारवाईमुळे पोलिसांच्या सायबर तपास कौशल्यावर पुन्हा एकदा विश्वास बसला आहे. हरवलेली मालमत्ता परत मिळाल्याने सामान्य नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, पोलिस यंत्रणेवरील विश्वास वाढला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*