छत्रपती संभाजीनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी एका ६० वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल ७.१५ किलो वजनाचा ओव्हरियन सिस्ट (गोळा) यशस्वीरित्या काढण्यात आला. खासगी रुग्णालयात अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी दीड ते दोन लाखांचा खर्च येतो, मात्र जिल्हा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात आली.

रुग्णेला तीव्र पोटदुखी आणि फुगण्याची तक्रार होती. तपासणीनंतर सोनोग्राफी आणि सीटी स्कॅनमध्ये पोटाच्या डाव्या बाजूला अंडाशयात मोठा गोळा असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे हा गोळा फुप्फुसापर्यंत पसरत असल्यामुळे गंभीर धोका निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.

ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुमारे दोन तास चालली. विशेष बाब म्हणजे, नुकतेच जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून रुजू झालेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी स्वतः ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये उभे राहून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यांच्या अनुभवामुळे आणि तत्परतेमुळे रुग्णाचा जीव वाचला.

ओव्हरियन सिस्ट म्हणजे काय?

अंडाशयात तयार होणारी पिशवीसारखी गाठ, जी अनेक वेळा लक्षणांशिवाय वाढत जाते. वेळीच निदान न झाल्यास ती गंभीर रूप धारण करू शकते. तीव्र वेदना, पोट फुगणे, भूक मंदावणे ही लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी गरजेची असते.

या शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय क्षमतेवर नागरिकांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. गरीब रुग्णांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,964 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क