छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने जालना रोडवर अतिक्रमणविरोधी मोठी मोहीम राबवली. शुक्रवारी सकाळपासून मोंढा नाका ते एपीआय कॉर्नरपर्यंत झालेल्या मोहिमेत सुमारे 180 पक्की आणि कच्ची बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली.

हॉटेल्स, गॅरेज, दुकाने, जाहिरात फलक, कंपाऊंड, शेड्स, कमानी आदी अतिक्रमण हटवण्यात आली. ही कारवाई महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या आदेशाने, अतिक्रमण विभागाचे संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत महापालिकेचे 350 कर्मचारी आणि पोलिस दलाचे 250 जवान सहभागी झाले. 15 जेसीबी, 4 पोकलॅन, 15 टिप्पर, रुग्णवाहिका, कोंडवाडा वाहने आणि अग्निशमन बंबांचा वापर करण्यात आला. नगररचना विभागाचे मनोज गर्जे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे उपस्थित होते.

गुरुवारी बाबा पेट्रोल पंप ते मोंढा नाका उड्डाणपूल दरम्यान 229 संरक्षण भिंती पाडण्यात आल्या. शुक्रवारी सेव्हन हिलपर्यंत 22.5 मीटर रुंदीपर्यंत अतिक्रमण हटवण्यात आले. सिंधी कॉलनीतील अतिक्रमणावर कारवाई करताना सहाय्यक आयुक्त अर्चना पवार जखमी झाल्या.

सध्या काही प्रतिष्ठित मालमत्तांना नोटिसा देऊन वेळ देण्यात आली असून, शनिवार-रविवारी मोहीम थांबवून सोमवारपासून पुढील टप्पा राबवण्यात येणार आहे, अशी माहिती संतोष वाहुळे यांनी दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,641 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क