छत्रपती संभाजीनगर : WhatsApp वर ‘आरटीओ चालान’ किंवा शासकीय योजनांच्या नावाने पाठविल्या जाणाऱ्या APK फाइल्सद्वारे मोबाइल हॅक करण्याच्या घटना सुरूच आहेत. छावणीतील मेडिकल व्यावसायिक शेख वसीमोद्दीन यांचा मोबाइल अशाच फाइलमुळे हॅक होऊन तब्बल ९ लाख रुपयांचा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

१५ जुलै रोजी ‘रिजास हेल्थ केअर’ या WhatsApp ग्रुपवर ‘आरटीओ चालान ५०० रुपये’ या नावाने आलेली APK फाइल वसीमोद्दीन यांनी इंस्टॉल केली. क्षणात त्यांचा मोबाइल हॅक झाला. ओटीपींचा भडिमार सुरू झाला. त्यांनी तत्काळ नेट बँकिंगद्वारे खाते गोठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या येस बँक खात्यातून २ लाख रुपये वळते केले आणि पुढील काही तासांत सात लाख रुपये काढले. त्याशिवाय, त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यावर ३ लाख ४५ हजारांचे जंबो लोन घेण्यात आले.

APK फाइल म्हणजे काय?

अँड्रॉइड पॅकेज किट (APK) ही अँड्रॉइड app इंस्टॉल करण्याची फाइल असते. अधिकृत Google Play Store वरील app सुरक्षित असतात, मात्र थेट लिंक किंवा WhatsApp, टेलिग्रामवरून आलेल्या फाइल्समुळे मोबाइलमध्ये लपलेले (हिडन) app इंस्टॉल होते. हे app बॅकग्राउंडमध्ये चालते आणि बँक app, मेसेज, कॉल, ओटीपी यांचा ताबा सायबर गुन्हेगारांना देते.

सावधानता उपाय:

  • WhatsApp चे Auto-Download मोड कायम बंद ठेवा.
  • अनोळखी app इंस्टॉल झाल्यास Flight Mode सुरू करून डिव्हाइस फॅक्टरी रिसेट करा.
  • तत्काळ १९३० या क्रमांकावर तक्रार नोंदवा.

सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अनोळखी लिंक्स किंवा APK फाइल्स इंस्टॉल न करण्याची सूचना दिली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,093 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क