छत्रपती संभाजीनगर : कपाटाचे लॉक दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात शिरून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास मुकुंदवाडी पोलिसांनी नंदुरबारहून अटक करून २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीचे नाव प्रबतसिंग दिलीपसिंग शिकलीकर (वय ३५, रा. एकतानगर, नंदुरबार) असे आहे.

दि. २० जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजता फिर्यादीच्या रामनगर येथील घरात वृद्ध आजी-आजोबा एकटे असताना आरोपी आला. कपाटाचे लॉक दुरुस्त करण्याचा बहाणा करून घरात प्रवेश करून त्याने आजींना फसवून कपाटाच्या लॉकरची चावी मिळवली व १.३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून पळून गेला. फिर्यादीच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी नंदुरबार येथील असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर विशेष पथकाने नंदुरबार पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. चौकशीत आरोपीने जवाहरनगर हद्दीतील गुरुद्वारा सिंधी कॉलनी परिसरात अशाच पद्धतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्याची पोत, चैन, अंगठी, दोन सोन्याच्या चेन आणि बाळाचे ब्रासलेट असा एकूण २.३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, उप-आयुक्त स्वामी, सहाय्यक पोलिस आयुक्त रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे, सहाय्यक फौजदार नरसिंग पवार, पोलीस हवालदार बाबासाहेब कांबळे, गणेश वैराळकर, शैलेंद्र अडियाल, अनिल थोरे, गणेश वाघ आणि रविंद्र बेंडे यांनी केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार नरसिंग पवार करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,778 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क