छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील दौलताबाद घाट परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुनील खंडागळे या तरुणाने आपल्या प्रेयसी दीपाली आसवार हिला घाटावरील व्ही पॉईंटवरून खाली ढकलून दिल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेत दीपालीचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुनील आणि दीपाली यांच्यात काही वैयक्तिक कारणांमुळे वाद झाला होता. हा वाद एवढा तीव्र झाला की सुनीलने संतापाच्या भरात दीपालीला घाटावरून खाली ढकलून दिले. या घटनेनंतर सुनीलने स्वतः शिऊर पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन दौलताबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस दल, फॉरेन्सिक विभागाची टीम आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून दीपालीचा मृतदेह घाटाखालून बाहेर काढून पोलीस ताब्यात देण्यात आला. सध्या मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या प्रकरणात नेमका वाद कोणत्या कारणावरून झाला, आरोपीने हत्या करण्याचा निर्णय का घेतला आणि या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेमुळे दौलताबाद परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. पोलिसांकडून सुनीलची सखोल चौकशी सुरू असून, त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना पुन्हा एकदा प्रेमसंबंधातील वाद किती टोकाला जाऊ शकतो याचे उदाहरण ठरली आहे. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील सर्व बाजू स्पष्ट होणार आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

11,910 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क