नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आणि IRCTC ने प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच फसवणूक रोखण्यासाठी मोठे बदल लागू केले आहेत. १ जुलै २०२५ पासून Tatkal तिकीट बुकिंगसाठी IRCTC खाते आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले असून, १५ जुलैपासून Tatkal बुकिंग करताना आधारावर OTP पडताळणी बंधनकारक केली आहे. या नव्या नियमांमुळे ऑनलाइन, काउंटर आणि एजंट बुकिंग सर्वांवर एकसमान प्रक्रिया लागू होणार आहे.

विशेषतः Tatkal स्लॉटच्या पहिल्या ३० मिनिटांत फक्त आधार-लिंक केलेले वैयक्तिक यूजर्स तिकीट बुक करू शकतील, तर ट्रॅव्हल एजंट्सना या काळात बुकिंगची परवानगी नसेल. या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांना Tatkal तिकिटे मिळण्याची संधी अधिक वाढेल.

यासोबतच, IRCTC ने टिकट बुकिंगमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी आतापर्यंत सुमारे २.५ कोटी निष्क्रिय व संशयित यूजर आयडीज बंद केले आहेत. ही कारवाई ऑनलाइन बॉट्स व फसव्या खात्यांवर नियंत्रण आणण्यासाठी करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगचा न्याय्य लाभ मिळेल.

प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण चार्ट तयार करण्याची वेळही बदलण्यात आली आहे. आता रेल्वे गाडी सुटण्याच्या ८ तास आधी चार्ट तयार केला जातो, ज्यामुळे प्रवाशांना सीट कन्फर्मेशनची माहिती लवकर मिळू शकते.

IRCTC च्या या बदलांमुळे प्रवास अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रवाशांनी आपले IRCTC खाते त्वरित आधारशी लिंक करून OTP साठी योग्य मोबाइल नंबर नोंदवावा, अशी सूचना रेल्वेने केली आहे.

हे बदल अमलात आल्यानंतर Tatkal तिकिटे मिळविणे सोपे होईल आणि दलालांवर नियंत्रण मिळवून प्रवाशांना न्याय मिळेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

 

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

990 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क