छत्रपती संभाजीनगर : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना विविध अनुभव येत असतात. मात्र, यावेळी एका नवविवाहित जोडप्याने रेल्वेच्या फर्स्ट एसी कूप डब्याचे थेट हनिमून सूटमध्ये रूपांतर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या अनोख्या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका नवविवाहित जोडप्याने नंदीग्राम एक्सप्रेस मधील फर्स्ट एसी कूप डबा सजवण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून एका खासगी डेकोरेटरची नियुक्ती केली होती. या जोडप्याने छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास कारने केला आणि त्यानंतर रेल्वेने पुढील प्रवास सुरू केला.

६ जुलै रोजी जालना रेल्वे स्थानकावर संबंधित डेकोरेटरने अनधिकृतपणे रेल्वे डब्यात प्रवेश करून डब्याची आकर्षक सजावट केली. रंगीबेरंगी फुगे, फुलांची सजावट, मखमली पडदे तसेच बर्थवर गुलाबाच्या पाकळ्यांमधून तयार करण्यात आलेला ‘आय लव्ह यू’ संदेश यामुळे संपूर्ण कूप हनिमून सूटप्रमाणे दिसत होता.

या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या कल्पनेचे कौतुक केले. तर काहींनी रेल्वेच्या डब्यात अशा प्रकारची खासगी सजावट करण्यास परवानगी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सुरक्षा, स्वच्छता आणि रेल्वे नियमांच्या दृष्टीनेही चिंता व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले असून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच डेकोरेटरविरोधात जालना येथे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,388 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क