छत्रपती संभाजीनगर :  आज पहिला श्रावणी सोमवार (दि. २७) असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी घृष्णेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येतील या अनुषंगाने मंदिर व्यवस्थापन व मंदिर ट्रस्टने व्यवस्थापन केले आहे. या वर्षी एक रस्ता भाविकांना येण्यासाठी व पूर्वेकडून भाविकांना बाहेर पडण्यासाठी नवीन रस्ता बनवण्यात आला आहे. यामुळे दर्शनासाठी जास्त वेळ लागणार नाही. यावर्षी साधारणपणे अर्ध्या तासात भाविकांना घृष्णेश्वराचे दर्शन होईल. तसेच स्मार्ट सिटी बस प्रत्येक १५ मिनिटाला छत्रपती संभाजीनगरातील मध्यवर्ती बसस्थानकातून धावणार आहे.

गर्दी बघता शनिवार, रविवारी व सोमवारी अभिषेक बंद राहतील. इतर दिवस मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी भक्तांची गर्दी बघता अभिषेक हा सकाळी ठेवले जातील, असेही मंदिर ट्रस्टकडून सांगण्यात आले. साधारणपणे सोमवारी दर्शनासाठी जवळपास २ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाने मंदिर परिसरात प्रसाद बनवण्यासाठी बंधने घालण्यात आली आहेत. तसेच मंदिर ट्रस्टकडून मोफत पिण्याचे पाणी व मोफत वैद्यकीय सेवा याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात दोन वैद्यकीय दवाखाने लावण्यात आले आहेत. तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर प्रसाद वाटप केला जाणार आहे.

विभागीय नियंत्रकांनी गतवर्षीप्रमाणे यंदाही वेरूळसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक १५ मिनिटाला सिटी बस तर ५ एसटी बस मध्यवर्ती बसस्थानकातून धावतील. तसेच सिडको बसस्थानकातून ५ बसेस धावतील. याशिवाय पैठणहून १, सिल्लोड १, वैजापूर १, कन्नड ३ व गंगापूर बसबस्थानकातून २ अशा एकूण ८ बसेस ग्रामीण भागातून वेरूळसाठी दिवसभर धावणार आहेत. वेरूळ मंदिर परिसरात मंदिरापासून ३०० मीटर अंतरावरच तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. ही पार्किंगची सेवा पेड स्वरूपात असेल. कुणीही रस्त्यावर वाहन न लावता पार्किंमध्येच वाहने लावावीत, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

783 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क