छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर साडी खरेदीसाठी शहरात आलेल्या महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैठण गेट परिसरातील एका दुकानात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात विधी संघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील ३२ वर्षीय महिला सणासाठी माहेरी आल्या होत्या. भावाच्या आग्रहावरून साडी खरेदीसाठी त्या आईसह शहरातील प्रसिद्ध दुकानात गेल्या. साडी निवडताना त्यांनी दोन साड्या खांद्यावर टाकून आरशासमोर बघत आईला दाखवत होत्या. यावेळी दुकानात सेल्समन म्हणून काम करणारा रेहान (नाव बदललेले) समोरील चेजिंग रूममध्ये पँट काढून अश्लील चाळे करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चेजिंग रूमचे दार उघडेच होते आणि त्याने तीन वेळा महिलेच्या दिशेने पाहत ही अश्लील कृती केली.

हा प्रकार महिलेनं त्वरित भावाला सांगितला. त्यानंतर रेहान पाठीमागच्या दरवाजाने पळून गेला. ही बाब दुकानमालकाला कळवताच त्याने संबंधित मुलाचे नाव व पत्ता सांगितला. काही वेळात शिवसेनेचे आदित्य दहिवाल घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर परिसरातील दुसऱ्या गटानेही दुकानासमोर गर्दी केली. मात्र प्रकरण हे महिलेशी संबंधित असल्याने दोन्ही गटांनी संयम राखत पोलिस ठाण्यात धाव घेतली.

तक्रारीनंतर क्रांती चौक पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित बालकाविरोधात भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,886 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क