वाळूज :  लिंबेजळगाव टोलनाका परिसरात एका महिलेला फसवून तिच्याकडील सुमारे ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना २९ जुलै रोजी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे अधिक तपास करत आहेत.

फिर्यादी उर्मिला रावसाहेब दुशिंग (वय ५०, रा. एम-८ म्हाडा कॉलनी, तिसगाव) या त्या दिवशी घरी परतण्यासाठी बसची वाट पाहत होत्या. दरम्यान, एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून एक इसम त्यांच्या जवळ आला व “मावशी, कुठे जायचंय?” असे विचारले. उर्मिला यांनी वाळूजला जाण्याचे सांगितले असता, “मी वाळुजलाच चाललो आहे, तिथे तुम्हाला सोडतो,” असे सांगून त्याने उर्मिला यांना गाडीवर बसवले.

थोड्याच अंतरावर बडवे कंपनी जवळ आल्यावर त्याने “गाडीत पेट्रोल नाही, गाडी वाकडी करून चालू करतो” असे सांगितले. उर्मिला गाडीतून उतरल्या आणि त्याच्या सांगण्यावरून त्याने दिलेली पिशवी धरण्यासाठी खाली वाकल्या असता त्या इसमाने त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या पोती जबरदस्तीने खेचून तात्काळ मोटारसायकलवरून पळ काढला.

चोरट्याने लंपास केलेल्या दागिन्यांमध्ये अंदाजे ६५,००० रुपयांचे ६.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पोत व २०,००० रुपयांचे १०२ ग्रॅम वजनाचे मणी असलेले मंगळसूत्र होते. एकूण सुमारे ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मोटारसायकलवरील फसवणुकीच्या प्रकाराने महिलांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,208 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क