युपीआय (UPI) व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने १ ऑगस्ट २०२५ पासून काही नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांचा उद्देश प्रणाली अधिक सुरक्षित, स्थिर व कार्यक्षम बनवणे हा आहे. हे बदल सामान्य वापरकर्त्यांना थेट आर्थिक भार न टाकता, UPI अ‍ॅप्स व सेवा पुरवठादारांवर केंद्रित आहेत.

नवीन नियमांनुसार, युजर्स आता एका दिवसात केवळ ५० वेळा बॅलन्स तपासू शकतील. तसेच, लिंक केलेली बँक खाती दिवसातून केवळ २५ वेळा पाहता येतील. व्यवहारांची स्थिती (Transaction Status) फक्त ३ वेळा तपासता येईल, आणि त्यामध्ये किमान ९० सेकंदांचे अंतर राखणे बंधनकारक आहे.

याशिवाय, ऑटोपे (AutoPay) सेवा देखील आता ठराविक वेळांमध्येच प्रक्रिया केली जाणार आहे – सकाळी १०, दुपारी १ ते ५ व रात्री ९.३० नंतर. त्यामुळे OTT सदस्यता, EMI, बीमा प्रीमियम अशा नियोजित पेमेंटसाठी वेळेची अधिक दक्षता बाळगावी लागेल.

NPCI च्या स्पष्टतेनुसार, या नव्या नियमांचा सामान्य वापरकर्त्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. शुल्क केवळ पेमेंट अ‍ॅग्रीगेटर्सना (जसे की Google Pay, PhonePe, Paytm) बँकांना द्यावे लागणार आहे.

UPI व्यवहाराची मर्यादा ₹१ लाख इतकीच कायम असून, आरोग्य व शिक्षणासाठी ₹५ लाखांपर्यंत व्यवहार शक्य आहे.

या बदलांमुळे युपीआयचा वापर अधिक सुरक्षित, नियोजित आणि प्रभावी होईल असा विश्वास NPCI ने व्यक्त केला आहे. वापरकर्त्यांनी या नियमांची माहिती ठेऊन व्यवहार करणे गरजेचे आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,771 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क