नवी दिल्ली: छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आणि संपूर्ण मराठवाड्यासाठी ऐतिहासिक ठरणारा निर्णय केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. 31 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ व आर्थिक व्यवहार समिती (CCEA)च्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यानच्या दुहेरी रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरी देण्यात आली.

या 177.29 किलोमीटर लांबीच्या ‘ब्राऊनफिल्ड’ प्रकल्पासाठी सुमारे 2,179 कोटी रुपयांचा खर्च होणार असून, यामुळे संभाजीनगर शहराचे दळणवळण, उद्योग, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना मोठा हातभार लागणार आहे. सध्या एकेरी मार्गामुळे सिकंदराबाद-मुंबई व विजयवाडा-बल्हारशाह कॉरिडॉरवरील रेल्वे वाहतुकीवर प्रचंड ताण आहे. दुहेरी मार्ग तयार झाल्यास हा ताण कमी होईल आणि प्रवासी वाहतूक व मालवाहतूक दोन्ही जलद व कार्यक्षम होतील.

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांतील हजारो नागरिकांचा प्रवासाचा वेळ 1 ते 1.5 तासांनी कमी होणार आहे. विशेषतः संभाजीनगर शहरातील ड्रायपोर्ट, एमआयडीसी आणि पर्यटनस्थळांना याचा थेट लाभ होणार आहे. उद्योगांना जलद मालवाहतुकीचा पर्याय मिळणार असून, शेती उत्पादनांची वाहतूकही अधिक सुलभ होईल.

या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींमुळे स्थानिक तरुणांना मोठा आधार मिळणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अजिंठा-वेरूळ लेणी व अन्य स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होईल.

या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर हे केवळ सांस्कृतिकच नव्हे तर लॉजिस्टिक हब म्हणूनही पुढे येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,302 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क