वाळूज  : आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ झाला असला, तरी काही माणसं आपल्या कृतीतून समाजासमोर नवा आदर्श ठेवतात. अशीच एक घटना वाळूजमध्ये घडली असून, एटीएममध्ये चुकून राहिलेले ५० हजार रुपये एका तरुणाने प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन केले.

गुरुवार (३१ जुलै) रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. मुरमी (ता. गंगापूर) येथील रहिवासी ज्ञानेश्वर सूर्यभान चाफे हे वाळूज येथील पुणे महामार्गावरील इंडिया वन एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. याच एटीएममध्ये काही वेळ आधी नवकार कम्युनिकेशन कंपनीचे कर्मचारी सचिन राठोड व श्रीमंत धाडबळे हे एक लाख रुपयांची रक्कम भरून गेले होते. परंतु चुकून त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचे पाचशेच्या नोटांचे एक बंडल एटीएममध्येच राहून गेले.

ज्ञानेश्वर चाफे एटीएममध्ये पोहोचल्यावर त्यांच्या नजरेस ही रक्कम पडली. त्यांनी कोणताही मोह न ठेवता तातडीने वाळूज पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ व पोलीस हवालदार संदीप धनगर यांच्याकडे ती रक्कम जमा केली.

दरम्यान, कर्मचारी पुढील एटीएममध्ये रक्कम भरत असताना एक बंडल कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वाळूज एटीएममध्ये धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज पाहून एक इसम बंडल घेऊन जाताना दिसल्याने त्यांनी तक्रार करण्याची तयारी केली होती. मात्र पोलिसांकडून आधीच रक्कम जमा झाल्याचे समजल्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

एटीएम मालक पारस छाजेड यांनी ज्ञानेश्वर चाफे यांचा सन्मान करत त्यांचे कौतुक केले. यावेळी एरिया इंचार्ज रमेश साठे, कर्मचारी राठोड व धाडबळे उपस्थित होते.

ज्ञानेश्वर चाफे यांची ही प्रामाणिक कृती समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,454 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क