छत्रपती संभाजीनगर: जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती वर्ष 2025-2026 च्या अध्यक्षपदी मा.श्री. अनिकेत निल्लावार यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड समितीची विशेष बैठक आयोजित करून करण्यात आली, जी संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत अध्यक्षपदासाठी अनिकेत निल्लावार यांचे नाव अभिजीत देशमुख यांनी सुचविले, तर त्यास अनुमोदन जगन्नाथ काळे यांनी दिले. यावेळी राजू शिंदे, शिवाजीराव कवडे, राजेश मेहता, तनसुख झांबड, डी. एन. पाटील, बबनराव नरवडे, हरीश शिंदे, अमोल झळके, ज्ञानेश्वर शेळके, विक्की जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी केले. यानंतर सर्व मान्यवरांचे आभार राजेश मेहता यांनी मानले. नूतन अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी संघटनेच्या कार्याला अधिक गतिमान व प्रभावी बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.

नूतन अध्यक्षांना पुढील कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार देण्यात आले असून लवकरच एक सर्वसमावेशक, कार्यक्षम व पारदर्शक कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. समितीच्या आगामी गणेशोत्सव कार्यक्रमांसाठी व्यापक नियोजन करण्यात येणार असून, शिस्तबद्धता, पर्यावरणपूरकता आणि सामाजिक सहभाग या त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे.

अनिकेत निल्लावार यांची निवड ही युवा नेतृत्वाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असून, गणेशोत्सवाचा उत्साह आणि एकोप्याचा संदेश समाजात पोहचवण्यात समिती यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,084 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क