छत्रपती संभाजीनगर : नारेगाव येथील कारवाईनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने आज, बुधवार (दि.६) पासून हर्सूल येथे अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू होत आहे. सकाळी हर्सूल टी पॉईंटपासून कारवाईला सुरुवात होणार असून मनपा हद्दीतील समृद्धी लॉन्सपर्यंत ही कारवाई होईल, अशी माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हर्सूलमध्ये महापालिकेने अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून टाकण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर १३ जुलै रोजी सुमारे ३००-४०० नागरिकांच्या शिष्टमंडळाने स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांची स्मार्ट सिटी कार्यालयात भेट घेतली होती. त्यावेळी नागरिकांनी जागेचा रोख स्वरूपात मोबदला द्यावा, अशी मागणी केली होती. आयुक्तांनी जागा संपादित करताना मोबदला दिला जाईल, मात्र मनपाची परवानगी न घेता केलेले अनधिकृत बांधकाम स्वतः पाडावे लागेल, असे स्पष्ट केले होते.

यानंतर काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून बांधकामे काढण्यास सुरुवात केली. तरीही हर्सूलमध्ये नागरिक व स्थानिक नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. महापालिकेने या रस्त्यावर असलेल्या धार्मिकस्थळे, कब्रस्तान, तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांबाबतही नोटिसा बजावल्या असून, काही नागरिकांनी धार्मिकस्थळांच्या कारवाईला विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर हर्सूल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाहुळे यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या कारवाया शांततेत झाल्या असून, नागरिकांचे सहकार्य लाभले आहे. हर्सूलमध्येही आम्ही हात जोडून विनंती करूनच कारवाई करू. नागरिकांनी मान्य केल्यास ठीक, अन्यथा पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई होईल. हर्सूल परिसरातील नागरिकांसोबत आतापर्यंत चार-पाच बैठका झाल्या आहेत. नागरिकांनी शहराच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वाहुळे यांनी केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,885 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क