रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि संरक्षणाच्या वचनाचा सण आहे. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य, सुख-समृद्धी व यशासाठी प्रार्थना करते. यंदा रक्षाबंधन ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत आहे.

पण राखी किती दिवस ठेवावी आणि कधी उतरवावी याबद्दल अनेकांना स्पष्ट माहिती नसते. धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधल्यानंतर ती किमान २४ तास तरी मनगटावर ठेवावी. काही मान्यतानुसार ३, ७ किंवा ११ दिवस राखी ठेवून उतरवतात. तर काहीजण श्रावण पौर्णिमेपासून भाद्रपद अमावास्येपर्यंत राखी ठेवतात. पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी राखी काढणे आवश्यक मानले जाते. काही लोक जन्माष्टमी किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशीही राखी उतरवतात.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून राखी खूप दिवस ठेवणे टाळावे. ती प्रामुख्याने सूती किंवा रेशमी धाग्याची असते, जी पाणी, धूळ किंवा मातीच्या संपर्कात आल्याने घाण होते. अशा स्थितीत बॅक्टेरियाचा धोका वाढू शकतो. म्हणून राखी स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असेपर्यंतच मनगटावर ठेवणे हितावह आहे.

राखी उतरवल्यानंतर तिला कधीही कचर्‍यात टाकू नये. धार्मिक दृष्टिकोनातून हा एक पवित्र धागा मानला जातो. त्यामुळे राखी पाण्यात विसर्जित करणे, झाडाला बांधणे किंवा झाडाच्या मुळाशी पुरून ठेवणे हे योग्य पर्याय आहेत. अशा प्रकारे राखीला सन्मानपूर्वक निरोप दिला जातो.

राखी हा केवळ धागा नाही, तर भावंडांमधील प्रेम, विश्वास, आदर आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. त्यामुळे ती काढण्याचे नियम पाळल्यास सणाचे महत्त्व अधिक वाढते आणि परंपरेला योग्य मान राखली जाते.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,449 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क