छत्रपती संभाजीनगरमध्ये आज स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणारा रंग दे बसंती २०२५ – एक भारत, एक मंच हा सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाचे यंदा १२ वे पर्व असून, अनाथ, दिव्यांग, एड्सग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

दरवर्षीप्रमाणे याही वेळी विशेष आकर्षण म्हणजे शहरातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांचे पुण्यात झालेले उत्कृष्ट सादरीकरण आज स्थानिक प्रेक्षकांसाठी अनुभवायला मिळणार आहे. सामाजिक जाणिवा आणि संस्कृतीचा संगम घडवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वृद्धीसोबतच समाजातील सकारात्मक बदलासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

कार्यक्रम आज शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी सायं. ४.३० वाजता त्रिलोकसिंग जबिंदा लॉन्स, बेंबडे हॉस्पिटल समोर, बीड बायपास येथे होणार आहे. आयोजकांनी नागरिकांना सहकुटुंब उपस्थित राहून या अनोख्या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात भर घालणारा हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. “चला, काहीतरी चांगलं करूया” या भावनेतून आयोजित केलेला हा महोत्सव प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

528 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क