छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील विविध पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून, यात छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयातील तिघांचा समावेश आहे. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक दीपक परदेशी, सहायक उपनिरीक्षक प्रमोद पवार आणि सहायक उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांची निवड झाली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी केले आहे. १५ ऑगस्ट रोजी या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले जाणार आहे.

दीपक परदेशी हे १९८९ मध्ये पोलिस दलात भरती झाले असून, त्यांनी ३५ वर्षे ९ महिन्यांची निष्ठावान सेवा बजावली आहे. विशेष शाखेत त्यांच्या कामगिरीचे मोठे कौतुक झाले असून, राजकीय संघटना आणि विविध हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे. त्यांच्या खात्यात तब्बल ३९७ रिवॉर्ड्स जमा झाले आहेत.

प्रमोद पवार यांनी १९९३ साली सेवेला सुरुवात केली. क्रांती चौक पोलिस ठाणे, वाहतूक नियंत्रण शाखा, क्राइम ब्रांच आणि आर्थिक गुन्हे शाखेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ३२ वर्षे ५ महिन्यांच्या सेवेत त्यांना २७७ रिवॉर्ड्स मिळाले असून, २०१९ मध्ये पोलिस महासंचालक सन्मानचिन्हानेही ते गौरवले गेले आहेत.

राजेंद्र मोरे हे देखील १९९३ मध्ये भरती झाले. त्यांनी जवाहरनगर, क्रांती चौक पोलिस ठाणे तसेच सीआयडी आणि मुख्यालयात सेवा दिली आहे. त्यांना २९८ रिवॉर्ड्स मिळाले असून, २०१६ मध्ये पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे.

या तिन्ही अधिकाऱ्यांचा सन्मान हा केवळ पोलिस दलासाठीच नव्हे तर छत्रपती संभाजीनगरकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,356 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क