छत्रपती संभाजीनगर :  मुंबई-पुण्यानंतर आता संभाजीनगरातही दहीहंडी उत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. आज संध्याकाळी शहरातील विविध भागात दहीहंडी सोहळे रंगणार असून, लाखो रुपयांच्या बक्षिसांसाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. तब्बल ८.५० लाख रुपयांच्या बक्षिसांसह ३५ ते ४० गोविंदा पथकांनी सात थरांपर्यंत तयारी केली आहे.

गारखेडा आणि सिडकोत भव्य बक्षिसांची हंडी

गारखेडा येथे आयोजित नमो दहीहंडी उत्सवात २ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. यावेळी अभिनेत्री पूर्वा गोरे आणि मधुरा जोशी उपस्थित राहणार आहेत. सिडको एन-७, बजरंग चौकातही २ लाख ५१ हजार रुपयांच्या दहीहंडीवर गोविंदांचा डाव साधला जाणार आहे. या सोहळ्याचे आयोजन मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

टीव्ही सेंटर, कॅनॉट प्लेस आणि औरंगपुरा येथेही आकर्षण

टीव्ही सेंटर चौकातील धर्मरक्षक दहीहंडी उत्सवात १ लाख ५१ हजार रुपयांची हंडी फोडली जाणार आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव होईल. कॅनॉट प्लेस येथे स्वाभिमान क्रीडा मंडळातर्फे १ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. यावेळी प्राइड ऑफ सिटी पुरस्कारांचे वितरण पद्मश्री उदय देशपांडे आणि चित्रा नाबर-केरकर यांच्या हस्ते होईल. औरंगपुरा येथील अश्वमेध क्रीडा मंडळातर्फे १ लाख रुपयांची दहीहंडी फोडली जाणार आहे, ज्यात सेलिब्रिटींची उपस्थिती राहणार आहे.

सुरक्षिततेसाठी विशेष सोय

महिलांसाठी स्वतंत्र सोय, जखमी गोविंदांसाठी रुग्णवाहिका, तसेच विमा संरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. काही पथकांनी सात थरांपर्यंत तयारी केली असून, सुमारे १२५ गोविंदांचा विमा काढण्यात आला आहे.

आज संध्याकाळपासून शहरातील विविध भागात गोविंदा आला रे आलाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

845 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क