छत्रपती संभाजीनगरात : आज गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून शहरातील अनेक भागांत दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या गैरसोयी टाळण्यासाठी दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत पाच प्रमुख भागांतील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. या कालावधीत वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे मार्ग राहणार बंद :
टीव्ही सेंटर चौक परिसरात साक्षी मंगल कार्यालय ते टीव्ही सेंटर, हडको कॉर्नर ते टीव्ही सेंटर, जिजाऊ चौक ते टीव्ही सेंटर आणि आयपी मेस ते टीव्ही सेंटर हा मार्ग बंद राहणार आहे.
कॅनॉट प्लेस परिसरात एचडीएफसी बँक एटीएम चौक ते कॅनॉट प्लेस, बॉम्बे स्टेशनरी ते कॅनॉट प्लेस, वायझेड फोर्ड शोरूम ते कॅनॉट प्लेस, सानप कार्यालय ते कॅनॉट प्लेस तसेच सिडको कार्यालयाजवळील रस्ता ते कॅनॉट प्लेस हा मार्ग बंद राहील.
गजानन महाराज मंदिर चौक परिसरात पतियाला बँक ते गजानन महाराज मंदिर चौक, जवाहरनगर पोलीस ठाण्याजवळ आदिनाथ चौक ते गजानन महाराज मंदिर चौक, त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर चौक आणि सेव्हनहिल उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.
कोकणवाडी चौक परिसरात पंचवटी चौक ते कोकणवाडी चौक, विट्स हॉटेल वेदांतनगर ते कोकणवाडी चौक, एसएससी बोर्ड ते कोकणवाडी चौक तसेच सेशन कोर्ट सिग्नल ते कोकणवाडी चौक हा मार्ग बंद राहणार आहे.
गुलमंडी परिसरात औरंगाबाद बुक डेपो ते गुलमंडी, पैठण गेट ते गुलमंडी, बाराभाई ताजिया चौक ते गुलमंडी, सिटीचौक ते गुलमंडी तसेच औरंगपुरा पोलीस चौकी ते बाराभाई ताजिया चौक हा मार्ग बंद राहणार आहे.
पोलिसांनी नागरिकांना सूचित केले आहे की, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच बंद मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. दहीहंडी उत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे; मात्र सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*