छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मालमत्ता करावरील व्याजावर दिलेल्या ९५ टक्के माफीची मुदत वाढवून ३१ ऑगस्टपर्यंत केली आहे. सुरुवातीला ही योजना १५ ऑगस्टपर्यंत होती, मात्र नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी ही मुदतवाढ दिली.

१५ जुलैपासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत गेल्या महिनाभरात तब्बल ३७ हजार २५९ मालमत्ताधारकांनी मनपाकडे ८२ कोटी ५७ लाख रुपये भरले. याशिवाय पाणीपट्टीमधूनही ३ कोटी ५० लाख रुपये जमा झाले. अशाप्रकारे एकूण ८६ कोटी ७ लाख रुपयांचा भरणा मनपाच्या तिजोरीत झाला आहे.

मनपाने २००० सालानंतर व्याजमाफीची योजना बंद केली होती. त्यापूर्वी २०१७ ते २०१९ या कालावधीत माफी देण्यात आली होती, परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. मागील पाच वर्षांत मनपाने अशी कोणतीही योजना आणली नव्हती, त्यामुळे मालमत्ता कर थकबाकीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला होता.

मात्र, ९५ टक्के व्याजमाफीच्या या योजनेला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. १५ ऑगस्टनंतर ७५ टक्के व्याजमाफीची नवी योजना लागू करण्याचा विचार होता, मात्र मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे सध्याचीच योजना पुढे नेण्यात आली आहे.

१ एप्रिल ते १५ ऑगस्टदरम्यान मनपाला मालमत्ता करातून १४६ कोटी १० लाख रुपये मिळाले आहेत. पाणीपट्टीमधून ११ कोटी ५० लाख रुपयांची वसुली झाली आहे. यंदा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीमधून मिळून २५० कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य मनपाने ठेवले आहे.

या निर्णयामुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांनी ही संधी साधून थकबाकी लवकरात लवकर फेडावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

963 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क