छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेमुळे अनेक कुटुंबांचे घरे पाडण्यात आली असून, बाधित नागरिकांसाठी महापालिकेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. ‘एक कुटुंब, एक घर’ या योजनेअंतर्गत म्हाडाच्या घरांची मोफत सोय करण्यात येणार आहे. महापालिकेला म्हाडाकडून १४८ घरांची यादी प्राप्त झाली असून, ही घरे बाधितांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.

महापालिकेने शहरातील बीड बायपास, पैठण रोड, जालना रोड, रेल्वे स्टेशन ते महावीर चौक, पडेगाव-मिटमिटा रस्ता, दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट, तसेच हर्सूल टी पॉइंट ते सिडको बस स्टँड या प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण पाडले आहे. या मोहिमेत तब्बल ५ हजारांहून अधिक बांधकामे जमीनदोस्त झाली. त्यामुळे आंबेडकरनगर, नारेगाव, जयभवानीनगर, मुकुंदवाडी, संजयनगर, चिकलठाणा, मिटमिटा, नक्षत्रवाडी, कांचनवाडी या भागातील नागरिक बाधित झाले आहेत. या कुटुंबांना आता महापालिकेच्या माध्यमातून घरे उपलब्ध होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, लाइट बिल, तसेच पाडण्यात आलेल्या जागेच्या मालकी हक्काचे पुरावे अशी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. प्रशासनाच्या मते, या योजनेमुळे बेघर झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन शक्य होणार असून त्यांना जगण्यासाठी सुरक्षित निवारा मिळणार आहे.

या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना जाहीर करण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. ‘एक कुटुंब, एक घर’ या योजनेमुळे नागरिकांना स्थैर्य मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,395 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क