छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या निर्णयाला संमती दर्शवली आहे.

जिल्ह्यात महसूल विभागांतर्गत कार्यरत असलेल्या १०८० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मिळून तब्बल १५ लाख ११ हजार ८१३ रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. ही संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीकडे देण्यात येणार असून तिचा उपयोग अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केला जाईल.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे. शासनाच्या विविध उपाययोजनांसोबतच अशा प्रकारे अधिकारी-कर्मचाऱ्यांची स्वयंस्फूर्त मदत ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरेल. यामुळे शेतकरी संकटातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

548 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क