छत्रपती संभाजीनगर : यंदाची दिवाळी विशेष ठरणार आहे. कारण, दरवर्षी पाच दिवस साजरी होणारी दिवाळी यंदा तब्बल सात दिवसांची आहे. पंचांगानुसार ५३ वर्षांनंतर हा दुर्मिळ योग आला असून, यावर्षी दिवाळीचा आनंद अधिक काळ टिकणार आहे. यंदा अमावास्या दोन दिवसांवर आल्याने सणाच्या दिवसांमध्ये दोन दिवसांची भर पडली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ‘छप्पर फाडके’ म्हणजेच सात दिवसांची ठरणार आहे.

दिवाळी सणाची सुरुवात आजपासून, म्हणजेच शुक्रवारी (दि.१७) वसुबारस पूजनाने होत आहे. या दिवशी गोवत्स द्वादशीनिमित्त गायी आणि वासरांची पूजा केली जाते व गोठ्यात दीपोत्सव साजरा केला जातो. शनिवारी (दि.१८) धनत्रयोदशी असून दुपारी १२.२० नंतर धनत्रयोदशीची पूजा करता येईल. रविवारी (दि.१९) कुबेरपूजा दुपारी १.५२ पर्यंत होईल. सोमवारी (दि.२०) नरकचतुर्दशी साजरी करून अभ्यंगस्नान केले जाईल. मंगळवारी (दि.२१) महालक्ष्मी पूजनाचा दिवस असून, सायंकाळी ६.११ ते रात्री ८.४० या वेळेत पूजन करणे शुभ मानले गेले आहे. बुधवारी (दि.२२) पाडवा किंवा बलिप्रतिपदा साजरी होईल, तर गुरुवारी (दि.२३) भाऊबीज या पारंपरिक दिवाळी सणाचा समारोप करेल.

विनोदशास्त्री पाठक गुरुजी यांच्या माहितीनुसार, १९७२ नंतर प्रथमच सात दिवसांची दिवाळी अनुभवायला मिळणार आहे. २०२२ मध्ये दिवाळी सहा दिवसांची होती, परंतु सात दिवसांचा योग गेल्या पाच दशकांत आला नव्हता. त्यामुळे यंदा संपूर्ण आठवडाभर दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात, कुटुंबीय आणि नातेवाईकांसह साजरा करण्याची संधी लाभली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

771 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क