छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार याद्यांमध्ये दुबार नावे (डबल नेम) आढळल्याच्या तक्रारी वाढत असून, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला गांभीर्याने चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात स्पष्ट आदेश दिले.

१ जुलै २०२५ रोजी अंतिम झालेल्या मतदार याद्यांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतले आहेत. त्यात विशेषतः एका व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी असल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, अशा दुबार नावांच्या प्राथमिक चौकशीत जर हे एकाच व्यक्तीचे असल्याचे लक्षात आले, तर त्याची खात्री करूनच त्याला मतदानाची संधी द्यावी. तसेच, एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त प्रभागांमध्ये असल्यास अशा मतदारांची यादी सूचना फलकावर आणि जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचे आदेशही देण्यात आले.

डबल नाव असलेल्या मतदारांना कोणत्या प्रभागात मतदान करायचे आहे, याबाबत लेखी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे मतदार या आवाहनाला प्रतिसाद देतील, त्यानुसार अंतिम यादीत त्यांचे नाव कायम ठेवले जाईल. परंतु प्रतिसाद न दिल्यास त्यांच्या नावासमोर “दुबार नाव” अशी नोंद करण्यात येईल. मतदानाच्या वेळी केंद्राध्यक्षांनी अशा मतदारांची ओळख तपासून खात्री पटल्यासच मतदानास परवानगी द्यावी, असे निर्देश दिले.

या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व नगरपालिकांचे मुख्याधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी मतदार याद्या बिनचूक तयार करण्याचे व प्रत्येक आक्षेपाचे सविस्तर निराकरण करण्याचे निर्देश दिले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

730 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क