छत्रपती संभाजीनगर : पाणीपुरवठा योजनेंतर्गत शिवाजीनगर भुयारी मार्गाची दुरुस्ती हाती घेण्यात आली असून या कामासाठी आज आणि उद्या हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी याबाबत माहिती देत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले.

दोन दिवसांसाठी शिवाजीनगर ते देवळाई चौक या भुयारी मार्गावरून सर्व प्रकारची वाहने बंद राहणार आहेत. दुरुस्तीच्या कालावधीत वाहतुकीची सोय सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विविध पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे. देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर उड्डाणपुलाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे देवळाई चौक ते गोदावरी टी, एमआयटी, महानुभव आश्रम चौक, रेल्वे स्टेशन मार्गेही वाहने जाऊ व येऊ शकतील.

याशिवाय देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर मार्गाने शहानूरमिया दर्गा चौकाकडे जाणारा मार्गही उपलब्ध असेल. शिवाजीनगर, सुतगिरणी चौक ते शहानूरमिया दर्गा चौक मार्गे वाहतूक उड्डाणपुलाचा वापर करून वळवली जाईल. शिवाजीनगर चौक, धरतीधन सोसायटी, गादीया विहार या मार्गांवरून शहानूरमिया दर्गा चौकाकडे जाण्यासाठीही पर्यायी मार्ग खुला ठेवण्यात आला आहे.

दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभाग कार्यरत असून नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा योजनेंतील महत्त्वाचे काम मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

940 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क