छत्रपती संभाजीनगर : हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा भव्य कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक मंत्री, आमदार, खासदार आणि विविध राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येने शहरात येणार आहेत. अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांसह सामान्य नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याने वसंतराव नाईक चौक परिसरात मोठी गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हा चौक सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, निर्धारित वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे. मुख्यमंत्री फडणवीस हे सार्वजनिक तसेच वैयक्तिक असे सुमारे पाच ते सहा कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याने शहरातील विविध ठिकाणी वेळेनुसार वाहतूक रोखण्यात येऊ शकते, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली. त्यामुळे नागरिकांनी नियोजनबद्ध प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक बदलांनुसार, हर्सूल कडून जालन्याकडे जाणारी वाहने वोखार्ड टी पॉईंटमार्गे गरवारे मैदान, कलाग्राम, प्रोझोन मॉल व एपीआय कॉर्नरमार्गे पुढे वळवली जातील. तसेच हर्सूलकडून क्रांती चौकाकडे येणारी वाहने सिडको एन–१ (एसबीआय) चौकातून चिश्तिया चौक, सेंट्रल नाका व सेव्हन हिल्समार्गे नेली जातील.

क्रांती चौकाकडून चिकलठाण्याकडे जाणारी वाहने थेट सिडको उड्डाणपुलावरून जातील, तर सिडको बसस्थानकाकडे जाणारी वाहने रामगिरी कॉर्नर व कॅनॉट प्लेसमार्गे पुढे सोडली जातील. जय भवानी नगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा व एन–२ परिसरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले असून सर्व वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

944 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क