महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) या वाढत्या उद्योगक्षेत्रावर आधारित पाच दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ पासून करण्यात आले आहे. कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योगांची वाढती मागणी आणि निर्यात क्षेत्रातील संधी लक्षात घेता हे प्रशिक्षण विशेष उपयुक्त ठरणार आहे. एमसीईडी विभागीय अधिकारी श्री. सुधाकर थोटे यांनी युवक, युवती आणि महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या प्रशिक्षणामध्ये उद्योजकतेसाठी आवश्यक व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, बाजारपेठेची पाहणी, तांत्रिक अभ्यासक्रम तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश आहे. निर्जलीकरण क्षेत्रातील तांत्रिक अभ्यासक्रमांतर्गत डीहायड्रेशनचे प्रकार, उद्योग संधी, व्हेजिटेबल कटिंग मशीन, ग्राइंडर, पॅकिंग आणि पॉलिशिंग मशीन, प्रोसेस लाईन सेटअप, मशीन सिलेक्शन, कच्चा माल उपलब्धता आणि निर्यात क्षेत्रातील अपेक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन दिले जाईल. तसेच मालाची क्वालिटी टेस्टिंग आणि बाजारपेठेत प्रवेश याबाबतही प्रशिक्षणार्थींना माहिती मिळणार आहे.
या प्रशिक्षणात प्रात्यक्षिक सत्रांना विशेष महत्त्व दिले गेले असून मेथी पावडर, पालक पावडर, हिरवी मिरची पावडर, आले-लसूण पावडर, कढीपत्ता, पुदीना पावडर, बटाटा पावडर, चिकू फ्लेक्स, पायनॅपल फ्लेक्स तयार करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया प्रशिक्षणार्थींना दाखवली जाणार आहे. वाढत्या फूड प्रोसेसिंग बाजारपेठेत या उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने हे प्रशिक्षण भविष्यातील उद्योग संधींचे दार खुले करणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी एमसीईडी विभागीय कार्यालय, A-38 एमआयडीसी परिसर, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा किंवा सौ. आशा कुरवडे (मो. ७८८८०७०४१९) यांच्याशी संपर्क साधावा.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*